युवा फोरम भारत संस्थेची जिल्हा कार्यकारणी जाहीर…

कुडाळ ता.१३-:युवा फोरम भारत संस्थेची जिल्हा कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली असून, कुडाळ येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

यावेळी संस्थेचे सचिव हितेश कुडाळकर, उपाध्यक्ष अमोल निकम, भूषण मेस्त्री उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षपदी शुभम सिंदगीकर, तर महिला जिल्हाध्यक्षपदी ऋतुजा मर्गज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यावेळी उपजिल्हाध्यक्ष पदी हार्दिक कदम ( कणकवली – मालवण), सचिव पदी केतन शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर तालुका कार्यकारणी मध्ये कुडाळ तालुकाध्यक्ष सौरभ शिरसाट, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या वेंगुर्लेकर, कणकवली तालुकाध्यक्ष विपुल भावे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, मालवण तालुकाध्यक्ष ऐश्र्वर्य मांजरेकर, , वेंगुर्ला तालुकाध्यक्ष डॉ. श्रीवर्धन आरोस्कर, वेंगुर्ला महिला तालुकाध्यक्ष श्रीहर्षा रेंगशे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष विकास लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे बोलताना म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी प्रमाणे रत्नागिरी, पुणे, मुंबई, सांगली, सातारा व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यकारणीची नियुक्ती होणार आहे. गेली चार वर्ष संपूर्ण राज्यभरात या संस्थेचे काम चालू असून, या संस्थेत जास्तीत जास्त तरुण युवक युवतींनी सहभागी होऊन स्वयंसेवक होऊन समाजसेवा करावी, यासाठी आपले नेहमी प्रयत्न राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page