भाजप आ नितेश राणेंची सडकून टीका
ओरोस-:राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणाला नेमके काय मिळाले ? असा खडा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. अर्थसंकल्पाचे गोडवे गाणाऱ्या कोकणातील नेत्यांना खरेच अर्थसंकल्प कळाला काय ?असा सवाल करतानाच हा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.
आ नितेश राणे यांनी पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. यावेळी पुढे बोलताना आ राणे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्या अर्थसंकल्पातही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली. तीच घोषणा काल सादर केलेल्या अर्थसंकल्पातही केली. मात्र मागील 2 वर्षांत प्रत्यक्षात कार्यवाही केलेली नाही. निदान यावर्षी तरी कोकणातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा 50 हजार चा प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही ? असाही सवाल नितेश राणे यांनी केला.
विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांसह राज्यातील चार गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 14 कोटीची भरीव निधी दिल्याची घोषणा केली. किल्ल्यासाठी जाहीर केलेला हा 14 कोटींचा तुटपुंजा निधी पुरेसा आहे काय ? भगवा आपला म्हणत छञपतींच्या नावाने राजकारण करणारे सरकार छञपतींच्या किल्ल्यासाठी तुटपुंजा निधी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार नितेश राणे यांनी केला. चौकट पालकमंत्री उदय सामंत हे दांडीबहाद्दूर मंत्री आहेत. जे कॅबिनेट लाही उपस्थित नसतात आणि जिल्ह्यातही नसतात. सिंधुरत्न योजनेंचा गवगवा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी या योजनेसाठी किती निधी अर्थसंकल्पात मिळणार हे जाहीर करावे. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पालकमंत्री उदय सामंत हे ना फ्लॉवर आहेत ना फायर…पालकमंत्री केवळ बटरफ्लाय आहेत अशी टीका नितेश राणे यांनी केली. चौकट नवीन उद्योजकांना स्टार्ट अपसाठी केवळ 15 कोटींचा निधी देऊ केलाय. जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमार तौक्ते वादळात झालेली नुकसानभरपाई मिळण्यासाठी वाट पाहताहेत. मात्र अजून 1 रुपयाही निधी दिला नाही. ग्रामीण रुग्णालयात आधी रिक्त वैद्यकीय पदे भरा. नंतर लघुशस्त्रक्रिये साठी डॉक्टर भरावेत असेही यावेळी नितेश म्हणाले.
