मळगाव येथील शारदा विद्यामंदिर परिसरात साफसफाई

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत निवासी शिबिरातून अनेक कामे मार्गी

सावंतवाडी ता.१०-:* मळगाव येथील शारदा विद्यामंदिर मळगाव रस्तावाडी या जिल्हा परिषद प्रशालेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी निवासी शिबिरातून साफसफाईसह अनेक कामे केली. या संस्थेच्या माध्यमातून गेले पाच दिवस मळगाव गावामध्ये निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या संस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी प्लंबींग, लाईट फिटींग, साफसफाई व सुतारकाम या माध्यमातून गावातील शाळा व ग्रामपंचायत परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली. या कामाची माजी सरपंच निलेश कुडव, स्वच्छता समिती अध्यक्ष गुरूनाथ गावकर, संस्थेचे शिक्षक वर्ग व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष काम सुरू असताना भेट देउन पहाणी केली.

You cannot copy content of this page