सावंतवाडी ता.१०-:* राज्य निवणूक आयोगाकडून सावंतवाडी शहराची प्रभाग रचना जाहीर झाली असून, यामध्ये नव्याने दोन प्रभाग वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण १० प्रभाग मधून २० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या आराखड्यावर आक्षेप घेण्यासाठी १७ तारीख दु. ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. यावेळी प्रभाग रचना जाहीर होताच आजी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.
प्रभाग क्रमांक १ मध्ये २२६८ मतदार असून झिरंग, म्हाडा कॉलनी, कावले अवाट, गुलमोहर कॉलनी, दत्तनगर, आय.टी.आय परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये २५९१ मतदार असून बाहेरचावडा, भटवाडी, बोर्जीसवाडा, नागवेकर अवाट, उपरल स्मशानभूमी, जिमखाना परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये २३६२ मतदार असून सबनीसवाडा, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, उपरलकर देवस्थान, एकमुखी दत्त मंदिर, गोठण, चीवार टेकडी परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये २२६६ मतदार असून वैश्यवाडा, रघुनाथ मार्केट, पांजरवाडा, चितारआळी, भटवाडी लक्ष्मी नगर, प्रांत कार्यालय आदींचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये २११७ मतदार असून उर्दू हायस्कूल, आत्मेश्वर मंदीर, जुम्मा मशीद, जुना बाजार, कलावती मंदीर, माठी परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये २६१९ मतदार असून होळीखुंट, जुना बाजार, निंबाळकर पीर, मिलाग्रीस चर्च, भोसले शिव उद्यान व मारूती मंदिर सालईवाडाचा समावेश असून प्रभाग ७ मधून २४४१ मतदार आहेत. कळसुळकर स्कुल, मच्छि मार्केट, हॉटेल मॅंगो, विठ्ठल मंदिर, अर्बन बँक, रामेश्वर प्लाझा, न.प. कार्यालय, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, संत गाडगेबाबा मंडई, मोती तलावाचा समावेश आहे. तर प्रभाग क्रमांक ८ मधून २२३० मतदार असून राजवाडा, उपजिल्हा रुग्णालय, सिधीवाडा, हेल्थपार्क, शिल्पग्राम, खासकीलवाडा, महादेव भाटले, आयुर्वेदिक कॉलेजचा समावेश आहे.
प्रभाग ९ मध्ये २३५२ मतदार असून जिल्हा कारागृह, आंबेडकर नगर, समाजमंदिर, श्रमविहार कॉलिनी, पोलिस लाईन, गरड, पाटणकर- खानविलकर आवाट, नवसरणी इमारत, जुस्तीन नगरचा समावेश असून प्रभाग क्रमांक १० मध्ये २६०५ मतदार असून तहसीलदार कार्यालय, जि.प. बांधकाम विभाग, वनविभाग, बीएसएनएल, मराठा वसतिगृह, सर्वोदय नगर, मोरडोंगरी परिसर, गणेश नगरचा समावेश आहे.
