नागरिकांची नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
*⚡कणकवली ता.०८-:* कणकवली- कनकनगरमध्ये अरुंद रस्ते , रस्त्यांलगत नसलेली गटारे , विजेचा दाब वारंवार कमी जास्त होणे यासह विविध समस्या आहेत.या समस्या सोडविण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी कणकनगरमधील नागरिकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे तसेच मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संजीवनी पवार शशिकांत मुणगेकर, स्नेहा राणे,निलेश पेडणेकर, सुभाष मर्गज,विलास चव्हाण,रश्मी हर्णे, सुजाता महाडेश्वर,पिलाजी राणे, अच्युतराव घाडीगावकर,स्नेहा अंधारी, सुभाष चव्हाण,प्रकाश सावंत आदी कनक नगर मधील नागरिक उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले की, कनकनगरमधील रस्ते अरुंद असल्याने नेहमीच वाहतुकीच्या समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत असून पादचाऱ्यांना चालणे अवघड बनले आहे . त्याचप्रमाणे रुग्णांना रुग्णवाहिकेतून घेवून जाणे , आग लागली असता अग्निशामक दलाची गाडी मागवणे शौचालयाच्या टाक्या साफ करण्यासाठी गाडी मागवणे नागरिकांना मुश्कील झाले आहे.
कनकनगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या समस्यांमुळे वाहतूक सुरळीत नसेल तर नगरपंचायत म्हणून आपण कोणती जबाबदारी घेणार आहात ? असा सवाल नागरिकांनी केला आहे . रस्त्यांलगत गटारे बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सांडपाणी पावसाळ्यातील पाण्याचा निचरा न होणे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहणे, पाणी तुंबून डासांची पैदास होणे , परिसरात दुर्गंधी पसरणे,विजेचा दाब कमी जास्त होऊन विद्युत उपकरणे निकामी होणे. यासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने याबाबत गांभीर्याने विचार करून त्या समस्या सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात , अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.तसेच येत्या न.प.निवडणुकीत कणकनगर मधील स्थायिक नागरिकास उमेदवारी मिळावी जेणे करून आमच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होईल असे मत देखील उपस्थित नागरिकांनी मांडण्यात आल्याचे सांगितले.
