गोमंतक साई सेवकच्या वतीने शिर्डी पद यात्रेचे आयोजन

बांदा : गाेमंतक साई सेवक आयाेजीत गाेवा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयाञेचे आयाेजन करण्यात आले आहे. गुरूवार दि. ७ पासून पासुन राष्ट्राेळी साईबाबा मंदीर सांगाेर्डा-गाेवा येथुन पदयात्रेचे प्रस्थान करण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पदयात्रा शिर्डी येथे पाेहचणार आहे. ८ जानेवारी राेजी बांदा-आळवाडा येथील साईमठामध्ये या पदयाञेचे सकाळी ११ वाजता आगमन हाेणार आहे. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने पदयाञेत सहभागी साईभक्ताचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी ११ वाजता श्री साईमठामधे साईची आरती केली जाणार आहे. काेराेना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून, सामाजिक अंतर राखून ही पदयाञा पुर्ण केली जाणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page