बांदा शहर पत्रकारांच्या वतीने विश्वनाथ नाईक यांचा सत्कार….

*💫बांदा दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त येथील पत्रकार विश्वनाथ नाईक यांचा बांदा शहर पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले, मंगल कामत, निलेश मोरजकर, प्रवीण परब, राकेश परब, मयुर चराटकर, अजित दळवी, विराज परब आदी उपस्थित होते. यावेळी मंगल कामत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आशुतोष भांगले म्हणाले की, ग्रामीण भागात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक असते. मात्र विश्वनाथ नाईक यांनी नेहमीच सामाजिक सलोखा राखत निस्वार्थी पत्रकारिता केली आहे. विश्वनाथ नाईक सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, माझ्या सहकारी पत्रकार मित्रांनी केलेला सत्कार हा माझ्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. यावेळी मंगल कामत, अजित दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राकेश परब यांनी केले.

You cannot copy content of this page