आरोसमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश….

*💫बांदा दि.०८-:* ग्रामपंचायतच्या ऐन रणधुमाळीत आरोसमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी पं.स.सदस्य रेश्मा नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आरोस गावाचा सर्वांगीण विकास शिवसेनेने केला असून ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी सुद्धा शिवसेनेचेच पॅनल निवडून येईल असा विश्वास पं.स.सदस्य रेश्मा नाईक यांनी व्यक्त केला. प्रवेशावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, विभागप्रमुख शरद धाऊसकर, युवासेना तालुकाधिकारी योगेश नाईक, मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, माजी सरपंच शंकर नाईक, माजी विभागप्रमुख गुरू नाईक, शाखाप्रमुख राजन परब, गुरू नाईक तसेच श्रीधर नाईक यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रसाद नाईक, प्रणेश नाईक, विजय नाईक, संतोष नाईक, अनिल सावंत, मोहन नाईक, विश्वजित कळंगुटकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. आरोस गावाचा सर्वांगीण विकासात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. सद्यस्थितीत गावासाठी मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता असून ती शिवसेनाच पूर्ण करू शकेल असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page