भंडारी ए सो हायस्कुलचा १२५ वा वर्धापन दिन सोहळयानिमित्त उद्या श्री सत्यनारायण पूजा

मालवण ता.०२-:* पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीज हायस्कुल या प्रशालेला दि. ३ मार्च २०२२ रोजी १२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशालेच्या १२५ व्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने उद्या दि. ३ रोजी प्रशालेत संस्थेच्या वतीने श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे . भंडारी समाजातील कष्टकरी महिला व पुरुषांनी एकत्र येत मालवण येथे ३ मार्च १८९७ रोजी भंडारी हायस्कुलची स्थापना केली होती. या हायस्कुलने आपली शैक्षणिक वाटचाल नेहमीच उज्वल ठेवली असून या प्रशालेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

यावर्षी ३ मार्च रोजी या प्रशालेस १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३ रोजी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी शाळेच्या सर्व संस्था पदाधिकारी, आजी- माजी विद्यार्थी, माजी शिक्षक,पालक, हितचिंतक, नागरिक यांनी शाळेला भेट द्यावी तसेच तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, आणि संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व्ही. जी. खोत आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page