माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांचा आरोप
सावंतवाडी ता.०१-:* माजी नगराध्यक्ष संजू परब हे वारंवार सावंतवाडी मतदार संघात आमदार दीपक केसरकर यांना पुरून उरले आहेत. त्यामुळे आमदार दीपक केसरकर हे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच आमदार दीपक केसरकर यांची बोलण्याची भाषा खालच्या पातळीवर आली आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी आता कितीही खटपट केली काहीही प्रयत्न केले तरीही सावंतवाडी मध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
