अध्यक्षपदी गुरुदास पेडणेकर तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड
सावंतवाडी ता.२८-: भंडारी समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदास पेडणेकर तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
