लोरे पंचायत समिती नूतन सभापतीची १२ जानेवारीला होणार निवड

*तहसीलदार पवार यांची माहिती

कणकवली : पं स च्या सभापतीपदाची निवडणूक १२ जानेवारी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली. दरम्यान नूतन सभापतिपदी लोरे मतदारसंघातील पं स सदस्य मनोज रावराणे यांचे नाव निश्चित झाले आहे. मावळते पं स सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसभापती दिव्या पेडणेकर यांच्याकडे सभापती पदाचा प्रभारी कार्यभार होता. रिक्त असलेल्या सभापती निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १२ जानेवारी रोजी नूतन सभापती निवड होणार असल्याची माहिती तहसीलदार पवार यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून कणकवली तहसीलदार काम पाहणार आहेत.

You cannot copy content of this page