कणकवली ता.२५-:* स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे च्यावतीने रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता ‘मराठी राजभाषा दिन ‘ साजरा केला जाणार आहे.यानिमित्ताने शालेय गटातील ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या मनपसंद विषयांवर मराठी भाषण करावयाचे आहे.स्पर्धेसाठी पाच मिनिटांची वेळ देण्यात आली आहे.सदरची स्पर्धा आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ येथे रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदरची स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार असून इयत्ता २ री ते ४ थी, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी असे तीन गटात करण्यात आले आहेत.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे येथे दयावयाची आहेत. तरी या स्पर्धेत तळेरे पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष विनय पावसकर यांनी केले आहे.
