कणकवली पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम
कणकवली ता.२४-:* कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व उपसभापती मिलींद मेस्त्री यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी पावनखिंड चित्रपट दाखवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कणकवली पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या माध्यमातूनस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळास्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सभापती मनोज रावराणे यांच्या सौजन्याने मोफत पावनखिंड चित्रपट दाखवण्यात आला.
यावेळी सभापती रावराणे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता यावेळी उपसभापती मिलिंद मेस्त्री,माजी उपसभापती प्रकाश पारकर, भाग्यलक्ष्मी साटम, महेश लाड, श्यामसुंदर दळवी, सूर्यकांत वारंग,बापू सावंत गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सुहास पाताडे, कैलास राऊत उपस्थित होते.केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी प्रास्ताविक केले तर आभार केंद्रप्रमुख विजय मसुरकर यांनी मानले
