२३ आणि २४ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपात सर्व कर्मचाऱ्यांनी व्हावे सहभागी…

शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांचे आवाहन

सावंतवाडी ता.२१-:* शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात २३, २४ रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित असल्याने सदर प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वय समितीतर्फे दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी संपाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, शिक्षक बांधवांचे मानधन, वेतन त्रुटी, शिपाई गणवेश भत्ता, बारा वर्षानंतर मिळणारी दुसरी कालबद्ध पदोन्नती, शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू करणे, शिक्षकेतर पदोन्नती, शाळा तेथे ग्रंथपाल व प्रयोगशाळा परिचर, मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नती वरील बंदी उठवणे,दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, सेवक भरती कायमची रद्द करणे अशा अनेक मागण्यांसंदर्भात दोन दिवसीय संपाचे आयोजन महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या व समन्वय समितीच्या माध्यमातून पुकारले असून सदर संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page