छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज दांडी शाळेतील लहान मुलांना वह्या व खाऊ वाटप.

*⚡मालवण ता.२०-:* मालवण शहरातील दांडी येथील जि.प.शाळा येथे शिव जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशाळेतील लहान मुलांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले आहे .हा कार्यक्रम विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या सहकार्याने घेण्यात आला

या कार्यक्रमात राष्ट्रीय काँगेसचे जेष्ठ नेते महेश अंधारी, अरविंद मोंडकर व मुख्याध्यापक श्री. शिवराज सावंत सौ. चव्हाण यांनी शिवरायांच्या जीवनावर लहान मुलांना मार्गदर्शन केलं, यावेळी माजी शिक्षिका सौ. नीलम करंगुटकर यांनी मुलांना शिवकथा सांगून खाऊ वाटप केले तर विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी वह्याचे वाटप केल्या या कार्यक्रमास काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, महेश अंधारी, सरदार ताजर, देवानंद लुडबे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, नीलम करंगुटकर, अरविंद मोंडकर आदि नागरिक उपस्थित होते

You cannot copy content of this page