देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीच्या प्लास्टिक आणि कपड्यांना आग…

वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला….

सावंतवाडी ता.२०:     खिडकीपाशी देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीचे प्लास्टिक तसेच कपड्याला आग लागली ही घटना आज स 10 30 च्या सुमारास येथील बस स्थानक परिसरातील बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावाधाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला     

संबंधित फ्लॅटच्या खिडकीवर देवासाठी दिवा पेटवण्यात आला होता. तर त्या फ्लॅट मधील मालक हे आज रविवारी सुट्टी असल्याने बहेर फिरण्यासाठी गेले होते दरम्यान त्या दिव्यावर खिडकीला लागून असलेल्या प्लास्टिक जाळीने अचानक पेट घेतला. तर खिडकीवर वाळत घातलेल्या कपड्यांना सुद्धा आग लागल्यामुळे भडका उडाला. याबाबतची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी धावाधाव करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी पालिकेचा अग्नीशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले नागरिकांच्या जागृतीमुळे होणारा पुढील अनर्थ टाकला. या मदत कार्यात माजी नगरसेवक सुरेश भुगटे, अग्निशमन बंबाचे वाहक नंदू गावकर , सतीश नार्वेकर, कोमल टोपले, संतोष दळवी आदींसह परिसरातील नागरिक व रिक्षा व्यवसायिकांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page