मालवण (प्रतिनिधी) आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या ३२ स्पर्धक महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे.
विजेत्याला साईसमर्थ कलेक्शनच्या भावना मुणगेकर यांच्याकडून सेमी पैठणी देण्यात येणार आहे. उपविजेत्या होम मिनिस्टरला येथील सी–कॅफेच्या प्रणया टेमकर यांच्याकडून सोन्याची नथ देण्यात येणार आहे. या स्पर्धेला उपस्थित स्पर्धकांसाठीही प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. नाव नोंदणी ग्रंथपाल विनिता कांबळी यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
