मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हंबीरराव चौगले यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्या डॉ.उज्ज्वला सामंत यांनी शिवरायांच्या कार्याचा धावता आढावा घेत त्यांचे कर्तृत्व तसेच त्यांची समयसूचकता व जनसामान्य जनतेला सोबत घेऊन जाण्याची वृत्ती याविषयी विचार मांडले. डॉ.आर.एन. काटकर यांनीही शिवरायांविषयी आपले विचार मांडले. प्रा.बी.एच.चौगुले यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा.डॉ.डी. व्ही.हरगिले, प्रा. के.के.राबते आदी उपस्थित होते.
