सरपंचांसह ग्रामस्थांनी वेंगुर्ला वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन
वेंगुर्ला प्रतिनिधी -नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या वायरमन रविद्र सुधीर परब यांना पुन्हा नोकरीवर रुजू करुन घेण्याबाबत दाभोली सरपंचांसह ग्रामस्थांनी वेंगुर्ला वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दाभोली येथील ग्रामस्थ रविद्र सुधीर परब हे वेंगुर्ला वीज वितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. तौक्ते वादळ असो किवा पावसाळ्याच्या दिवसात खंडीत झालेला वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी दाभोली ग्रामस्थांना सहकार्य केलेले आहे.
असे असताना १२ फेब्रुवारी रोजी त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. श्री.परब यांची आत्तापर्यंतची काम पहाता त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घ्यावे असे नमूद केले आहे. निवेदन सादर करतेवेळी सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर यांच्यासह एकनाथ राऊळ, नरेश बोवलेकर, दादा सारंग, राजाराम कांबळी, भाऊ बोवलेकर, मनोज दाभोलकर, उमेश खानोलकर, बिटू दाभोलकर, विनय कांदळकर, देवेंद्र राऊळ यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. फोटोओळी – दाभोली वायरमन रविद्र परब यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी निवेदन देण्यात आले.
