जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अलिशा व अंकिता प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कुडाळ हायस्कूलच्या कु.अलिशा अनिल पाटकर हिने तर खुल्या गटातून सावंतवाडीच्या कु.अंकिता सुहास नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला.

स्पर्धेचे हे २१ वे वर्ष होते. शालेय गटात १९ तर खुल्या गटात १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे – शालेय गट-प्रथम-अलिशा अनिल पाटकर (कुडाळ हायस्कूल), द्वितीय – वरद संदेश प्रभू (बिबवणे विद्यालय), तृतीय-आर्या सुयोग सातोसकर (उभादांडा स्कूल), उत्तेजनार्थ-कृपा उत्तम म्हाडदळकर (उभादांडा स्कूल) व निल नितीन बांदेकर (बांदा नं.१), खुला गट-प्रथम-अंकिता सुहास नाईक (सावंतवाडी), द्वितीय-नेत्रा मिलिद गावडे (सावंतवाडी), तृतीय-विराज गणेश आरावंदेकर (दाभोली), उत्तेजनार्थ-संजना लिलाधर रेडकर (उभादांडा) राहूल विलास वाघदरे (घारपी) यांनी यश प्राप्त केले.

शालेय गटासाठी अॅड. चैतन्य दळवी व वैभव खानोलकर यांनी तर खुल्या गटासाठी अजित राऊळ व बी.टी.खडपकर यांनी परिक्षण केले. स्पर्धेसाठी टाईम किपर व इतर सहकार्य कु.लविना डिसोझा, कु.मंथन देसाई व सदाशिव उर्फ बंटी सावंत यांनी काम पाहिले.

खुल्या गटाचे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.नंदगीरीकर यांच्या हस्ते तर शालेय गटाचे बक्षीस वितरण प्रा.देविदास आरोलकर, प्रा.विवेक चव्हाण, अजित राऊळ, बी.टी.खडपकर, वैभव खानोलकर व अॅड.चैतन्य दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे सुत्रसंचालन व आभार प्रा. सचिन परुळकर यांनी केले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई व प्रशासन अधिकारी मंजिरी देसाई-मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजय पाटील, सुनील आळवे व सचिन परूळकर यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page