ग्लोबल रक्तदाते समूहाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*💫मालवण दि.०५-:* ग्लोबल रक्तदाते मालवण तर्फे अमेय देसाई यांच्या निवासस्थानी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आदर्श रक्तदाते व आदर्श रक्तदाता कुटुंब हे पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर रक्तदान केलेल्या रक्तदात्यांनाही सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदाते मुकेश बावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेविका आकांशा शिरपुटे तसेच ग्लोबल रक्तदाते, एकता मित्रमंडळ आणि धक्का मित्रमंडळ समूहातील सर्व सदस्य उपस्थित होते. या शिबिरामध्ये महिलांना रक्तदान करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात आले. या शिबिर प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. सोनू ओटवणेकर , एपीआय भारत फारणे, पीएसआय शितल पाटील तसेच मालवणचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी पोलिस निरीक्षक श्री ओटवणेकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.बालाजी पाटील यांच्या हस्ते कोरोना काळात गरजेच्या वेळी उपस्थित राहून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना आदर्श रक्तदाते कुटुंब आणि आदर्श रक्तदाते असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्लोबल रक्तदाते आदर्श कुटुंब पुरस्कार राजा शंकरदास आणि कुटुंबीय तसेच रोहित पाटकर, विराज पाटकर आणि कुटुंबीय यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर आदर्श ग्लोबल रक्तदाता पुरस्कार निलेश गवंडी , राजेंद्र बिडये, सचिन आरोलकर , अशोक(अण्णा) कारेकर, मनोज चव्हाण, राजेश पारधी, विकास पांचाळ, नाभिराज वणकुद्रे, कुणाल मयेकर, सुरज भोसले, वैभव मेस्त्री, किरण वालावलकर, अजिंक्य पारकर , सौ .राधा गोविंद केरकर, सौ. नेहा कोळंबकर शंकरदास, आणि धक्का मित्रमंडळ यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या पथकाने तसेच माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर, विद्या मेस्त्री, विजय पांचाळ, अमेय देसाई, राजेंद्र बिडये, सचिन आरोलकर, राजा शंकरदास, मुकेश बावकर, बाबू डायस, संदीप पेडणेकर, आतू फर्नांडिस, सुरज भोसले, विकास पांचाळ, केदार देसाई, तुषार मेस्त्री, वैभव मेस्त्री, हितेंद्र हिर्लोस्कर, दर्शन गावकर, गौरेश कांबळी, भूषण पिसे, प्रणव गावकर, अनिकेत चव्हाण, नितेश जाधव, सौ. राधा केरकर, सौ. नेहा शंकरदास, सौ. आशा देसाई, सौ. किरण देसाई आदी सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

You cannot copy content of this page