Headlines

मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांचा राजीनामा मागे

बांदा ता.१८-:* जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या ऐन तोंडावर मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर सूर्यकांत नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सेनेला धक्का बसणार होता. परंतु जि. प.सदस्य राजू मुळीक व शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी श्री. नाईक यांच्याशी एकत्र चर्चा केल्यानंतर समीर नाईक यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे मतदारसंघात सेना वर्तुळात आनंद निर्माण झाला आहे.

मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक काळात महत्त्वाची भूमिका निभावणारे मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर सूर्यकांत नाईक यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा पक्षाने स्वीकारला नव्हता. तोपर्यंत मात्र अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हा बँक आजी-माजी संचालकांच्या श्री. नाईक यांच्याशी गाठीभेटी झाल्या. परंतु राजू मुळीक व राजू शेटकर यांनी चर्चा केल्याने आपला प्रश्न सुटला असून आपण वैयक्तिक कारणास्तव दिलेला राजीनामा मागे घेतल्याचे समीर नाईक यांनी सांगितले. त्यामुळे समीर नाईक भविष्यात कोणत्या पक्षात जातात की राजकीय क्षेत्राबाहेर जातात अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

You cannot copy content of this page