शेर्पे येथील रस्त्यांच्या कामांचे सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन
कणकवली ता.१७-:* जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आणि शिवसेना खास. विनायक राऊत यांच्या शिफारशीने व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मंजुरीने कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील महत्वाच्या दोन रस्त्यांच्या विकास कामाचे भूमीपुजन शिवसेना नेते व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते शेर्पे या गावी करण्यात आले.शिवसेना पक्षाच्या वतीने सध्या खारेपाटण विभागात विविध विकास कामांचा धडाका सुरू करण्यात आला असल्याची माहिती यावेळी कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांनी यावेळी सांगितले.
शेर्पे रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाल कणकवली शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले,शेर्पे शाखाप्रमुख भूषण शेलार,धनराज शेलार,मंदार पवार, प्रकाश नमसे,दीपक नमसे,अनंत यादव,जनार्दन सुतार,वासुदेव पवार, मधु आण्णा,नामदेव कदम,उदय पवार,रामचंद्र राऊत,तुकाराम तेली अक्षय परितकर,ग्रामपंचयत सदस्य तथा महिला शाखा प्रमुख सुनंदा तेली,शोभा कदम,जयश्री तेली,दीपाली नमसे,प्रतिभा नमसे,सरिता पवार, विजया पवार,विजया देवधर संजय कापसे, विजय कावळे,अशोक कराडे,विलास ब्रह्मदंडे,शशिकांत परीतकर,रमेश ब्रम्हदंडे,सुभाष ब्रम्हदंडे आदी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने जिल्हा वार्षिक योजना आरखड्यातून नामदेव कदम यांचे घर ( शेर्पे,भटवाडी )ते बंडू काका देवधर यांचे घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या रस्त्यासाठी सुमारे ३ लाख रुपये मंजूर झाले असून शेर्पे मुख्य रस्ता ते जैनवाडी कडे जाणार रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या रस्त्यासाठी सुमारे ३ लाख रुपये मंजूर झाले असून या दोन्ही रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला असल्याची माहिती कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांनी दिली.
