जानवली नदीवर होणार दोन पादचारी पूल;२८ कोटीचा निधी मंजूर

पादचारी पुलाना सर्विस रोड जोडला जाणार; पाठपुराव्याला आले यश

कणकवली ता.१७-: कणकवली शहरालगतच्या जानवली नदीवर ये – जा करण्यासाठी दोन पादचारी पूल केंद्रसरकारने मजूर केले आहेत.त्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील भेटी दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर आवश्यक त्या सुधारणा आणि नवीन बांधकाम करण्यावर चर्चा झाली होती, त्या नुसार जानवली पुलाच्या डाव्या उजव्या बाजूने लोकांना चालत जाणे-येणे सोयोचे व्हावे म्हणून पादचारी पूल व्हावा असे नाम. राणे यांनी सूचित केले होते. त्यानुसार ही मागणी पूर्ण करून पादचारी पूल मजूर केला आहे.

गडनदी आणि जानवली नदीमध्ये कणकवली शहर वसलेले आहे. शहरा जवळच्या गावातील लोक चालत शहरात येत असतात. गडनदीवर पादचारी पूल मुख्य पुलालाच जोडलेला आहे मात्र जाणवली नदीला तसा पूल नसल्यामुळे मुख्य रस्त्याच्या कडेने चालत जावे लागते अशा वेळी भरधाव यणाऱ्या वाहनांची पादचाऱ्याला ठोकर बसून अपघात होण्याची शक्यता असते या सर्वच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने जाणवली नदीला पादचारी पूल मंजूर केले आहेत. या पुलांची मागणी भाजपाचे स्थानिक आमदार नितेश राणे, भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, यांनी सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती.

एकंदरीत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ८२ मिटर लांबीचा एक असे दोन पादचारी पूल या ठिकाणी बांधले जाणार आहेत . या दोन्ही पादचारी पुलांची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून पुढील एक महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच ८२ मीटर लांबी व प्रत्येकी ११ मीटर रुंदी असलेले हे पादचारी पूल जाणवली नदीवर झाल्यानंतर पादचारी पुलाना कणकवली शहरातून येणारा व कणकवली शहराकडे जाणारा सर्विस रोड जोडला जाणार आहे .येत्या काही महिन्यात या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होण्याचा मार्ग काम मंजुरीमुळे मोकळा झाला आहे . याच सोबत कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजला जोडणारा बॉक्सेल ब्रिजचा वारंवार कोसळणारा भाग काढून तो भाग पुन्हा नव्याने करण्याबाबत ठेकेदार कंपनीला सूचना देण्यात आल्याचेही महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले . वारंवार फ्लाय ओव्हर ब्रिज ला जोडणारा बॉक्सेल ब्रिज कोसळणे किंवा खचण्याचे प्रकार होत असल्याने या बॉक्सेल ब्रिजच्या वरील रस्त्याच्या भागात सिमेंटची बॅरिकेट लावून ठेवण्यात आली आहेत . मात्र पावसाळ्यानंतर ही बॅरिकेट अद्याप दूर न करता अद्यापही जैसे थे स्थितीत आहेत . त्यामुळे याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल . व बॉक्सेल ब्रिज चा कोसळणारा भाग काढून ते काम नव्याने करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे महामार्ग प्राधिकरण कडून सांगण्यात आले . दरम्यान कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिजला जोडणाऱ्या बॉक्सेल ब्रिज च्या खचलेल्या व कोसळणाऱ्या भागाच्या दुरुस्तीसह महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत प्रलंबित असणारी अन्य कामे देखील करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page