छत्रपती शिवाजी महाराजांची कणकवली शहरातून भव्य मिरवणूक
कणकवली 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक मध्ये 19 फेब्रुवारी ला साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी 10.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची चलचित्र देखावा असलेली भव्य मिरवणूक ढोलताशच्या गजरात सायंकाळी 6 वाजता पटवर्धन चौक ते बाजरपेठ मार्गे तेलीआळीतून शिवसेना शाखे पर्यंत काढण्यात येणार आहे तसेच शिवसेना शाखे मध्ये सत्यनारायण च्या महापूजेचे आयोजन करण्यात आलेल आहे.
शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शिवसेना सहकार प्रमुख संदेश पटेल, शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, आधी शिवसेनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींनी तसेच शिवसैनिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, शहर प्रमुख शेखर राणे, आणि छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव प्रमुख माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे.
