*निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी लंबे यांची बदली रद्द करण्याची मागणी
*💫सावंतवाडी दि०५-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी लंबे यांची अचानक बदली केली गेल्याने या बदलीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला. याबाबत अँटी करप्शन फाऊंडेशनचे सिधुदुर्ग व गोवा व्हाईस स्टेट प्रेसिडेंट नयनेश गावडे यांना समजताच त्यानी ही बदली त्वरित रद्द करावी यासाठी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी फाऊंडेशनचे सावंतवाडी तालुका प्रेसिडेंट एकनाथ चव्हाण, व्हाईस प्रेसिडेंट संतोष तळवणेकर, सावंतवाडी तालुका प्रेस प्रेसिडेंट शैलेश मयेकर आदी उपस्थित होते. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मळगाव, तळवडे,नेमळे, ओटवणे, माजगाव, वेत्ये ही गावं येतात. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी लंबे व डॉ. विक्रम म्हस्के हे दोन्ही अधिकारी आल्यापासून रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत आहे. त्यामुळे रुग्णांना वारंवार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जावं लागत नाही. अशा चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांची अचानक बदली करून दशक्रोशीवर अन्याय केला जात असल्याचे या निवेदनात म्हटले असून ही बदलो तत्काळ थांबबावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
