चेअरमन आपल्या दारी’ जिल्ह्यातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम:मनिष दळवी

असलदेत ‘चेअरमन आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ

कणकवली १३ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना समृद्ध करणं किंबहुना त्या माध्यमातून गावाला समृद्ध करण्याचे महत्त्वाचे योगदान विकास संस्था करु शकतात.असलदे सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांच्या संकल्पनेतून असलदे विकास संस्थेत ‘चेअरमन आपल्या दारी’ या उपक्रमाचा आज शुभारंभ होताना आनंद होत आहे.सहकार क्षेत्रात हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा पायंडा आहे,थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी चांगला प्रयत्न आहे.जिल्ह्यातील विकास संस्था पदाधिकाऱ्यांसमोर उपक्रम आदर्श राहील. ‘चेअरमन आपल्या दारी’ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे कौतुकोद्गार बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. असलदे ग्रामपंचायत येथे रामेश्वर सभागृहात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि,असलदे ‘चेअरमन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी चेअरमन प्रकाश परब,सरपंच पंढरी वायगणकर, असलदे सोसायटीचे चेअरमन,पत्रकार भगवान लोके,आयनल चेअरमन भालचंद्र साटम,व्हाइस चेअरमन दयानंद हडकर, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, उपसरपंच तथा सोसायटी संचालक संतोष परब,संचालक दिनकर दळवी,उदय परब, शत्रुघ्न डामरे, शामराव परब,कांचन लोके,विठ्ठल खरात,प्रकाश खरात,परशुराम परब,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,माजी सरपंच लक्ष्मण लोके,बँक व्यवस्थापक सचिन कदम,सुरेश मेस्त्री,अनिल कोठारकर,संदेश आचरेकर, अजय परब,विनायक जांभळे,श्री. पांचाळ,दिनेश तावडे,राजेंद्र राणे,चंद्रकांत जेठे,प्रकाश आचरेकर,पंकज आचरेकर, प्रशांत लोके,रघुनाथ लोके,विजय आचरेकर,शैलेश हरमलकर,विजय डामरे,सचिन लोके,बाळा परब,श्री.पोकळे,सोसायटी सचिव अजय गोसावी , ग्रामसेवक आर.डी . सावंत,पोलीस पाटील श्रीमती पाताडे व गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी,संस्थेचे आजी माजी संचालक व शेतकरी सभासद आदी उपस्थित होते. पूर्वीच्या संचालकांच्या योगदानाची जाणीव ठेवून तरुण पिढीने नवीन दिशा या विकास संस्थेना देण्याची काळाची गरज आहे.त्याची सुरुवात असलदे विकास संस्थेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आहे. सगळ्याच विकास संस्थांच्या चेअरमन त्यांचे संचालक मंडळानी भगवान लोके यांच्या संकल्पनेतून चेअरमन आपल्या दारी घातलेला पायंडा आहे, तो जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राबवावा. गावागावात शेतकऱ्यांची बँक म्हणून विकास सहकारी संस्था शेतकऱ्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्या दृष्टिकोनातून या संस्थेने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहीजे.

जिल्हा बँक सुद्धा निश्चितपणे या उपक्रमाला जिल्ह्याभरात घेऊन जाण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करेल. शेती वाढली पाहिजे, त्याच्या शेती उत्पन्न वाढले पाहिजे, शेतीच्या व्यवसायात गावांमध्ये टिकला पाहिजे. या दृष्टिकोनातून मला वाटतं ही विकास संस्था काम करेल. तसेच जिल्हा बँक या संस्थेला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे विश्वास बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला.

यावेळी तहसीलदार आर .जे पवार म्हणाले, ” चेअरमन आपल्या दारी” हा नाविन्यपूर्ण उपक्रम भगवान लोके व संचालक मंडळ राबवत आहे.शेतकऱ्यांना सोयीचे होण्यासाठी हा उपक्रम चांगला आहे. गावातील नागरीकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा,त्यातून उन्नती साधावी.शेतकऱ्यांनी पीकपाणी नोंद करावी,असे आवाहन त्यांनी केले. चेअरमन भगवान लोके म्हणाले,असलदे या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थर उंचावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.शेतकरी सभासदाना संस्थेच्या विविध कर्ज योजना, नव्याने सभासद नोंदणी व संस्थेच्या लोकसहभाग वाढविण्यासाठी आम्ही चेअरमन आपल्या दारी हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित बँक चेअरमन मनीष दळवी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन चेअरमन भगवान लोके यांनी सत्कार केला . तसेच तहसीलदार रमेश पवार, नूतन उपसभापती मिलिंद मेस्त्री,भालचंद्र साटम,माजी चेअरमन प्रकाश परब,सरपंच पंढरी वायगणकर,बँक व्यवस्थापक सचिन कदम व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सुत्रसंचालन पत्रकार ऋषिकेश मोरजकर, आभार सरपंच पंढरी वायंगणकर यांनी मानले.

You cannot copy content of this page