आम. दीपक केसरकर यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
सावंतवाडी ता.०९-: शहरातील काही नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. त्यांनी तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत. असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
तसेच ते यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आज अनेक जणांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. ते योग्य नाही. कोरोना पासून रक्षण होण्यासाठी केवळ मास्क हेच माध्यम आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
