‘त्या’ गाळ्याचे भाडे जुन्याच दराने भरा

आमदार दीपक केसरकर : नवीन ठरलेली किंमत २-३ हफ्त्यात जमा करण्याची मुदत

सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी कॉप्लेक्स मधील व्यापारी आणि नगरपालिका प्रशासन यामध्ये गेले काही महिने गाळ्यांच्या भाड्यावरून सुरू असणारे वाद आता संपले आहेत. गेल्या दीड दोन वर्षातील गाळ्याचे भाडे जुन्याच दराने भरण्याच्या सूचना मी दिल्या असून,येत्या काही दिवसात ते व्यापारी नगरपालिकेत गेल्या दीड दोन वर्षातील भाडे जमा करतील असे स्पष्ट केले आहे.

तसेच त्या गाळ्यांची पूर्वीप्रमाणेच सर्वांना समान दर प्रमाणे नवीन ठरलेली किंमत २-३ हफ्त्यात जमा करण्याची मुदत देण्यास आली आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

You cannot copy content of this page