कणकवली ता.०९-:* महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान तथा उमेदच्या अंगर्गत असणाऱ्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील क्रांतीज्योती महिला बचत गट खारेपाटण यांच्यावतीने येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्गासाठी एकदिवसीय “परस बाग बनविणे ” प्रात्यक्षिक व मार्गदर्शन वर्ग झाला.
यावेळी खारेपाटण केंद्रशाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर, महिला बचत गटाच्या प्रमुख सी पी आर सौ.आस्था पाटणकर, तसेच क्रांतीज्योती महिला बचत गटाच्या सदस्या सौ करिना गुरव,नीलम गुरव,पूजा निग्रे,अमिषा गुरव,वंदना कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बचत गटाच्या महिलांनी खारेपाटण केंद्र शाळेच्या प्रांगणात विदयार्थ्यांना परस बाग बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून विविध भाज्यांची मुलांसमवेत लागवड केली. तर बचत गटाच्या प्रमुख आस्था पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बचत गटाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शाळेच्या पदवीधर शिक्षक संजय राऊळ,श्रीम.अर्चना तळगावकर,सहाय्यक शिक्षिका श्रीम.स्मिता कोरगावकर,रेखा लांघी,अलका मोरे,रुपाली पारकर,आदी शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
