Headlines

मदिना मज्जीत ते शिकेरीवाडी रस्ता खड्डेमय

जास्मिन लक्षमेश्वर यांचे मुख्याधिकारी याना निवेदन

सकारात्मक निर्णय घेण्याचे सीओचे आश्वासन

सावंतवाडी ता.०९-: येथील बाहेरचावाडा मदिना मज्जित पासून ते शिकेरीवाडी पर्यतच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले असून रास्ता पूर्णतः खराब झाला आहे यामुळे येणार्‍या-जाणार्‍या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून असाच खड्डेमय रस्ता कायम राहिल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी एन एस यु तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर यांनी या रस्त्याकडे मुख्याधिकाऱ्यांची लक्ष वेधले असून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी उद्या सकाळी पाहणी करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले

याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना आज काँग्रेस च्या वतीने देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटी, अध्यक्ष ऍड . राघवेंद्र नार्वेकर, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष साद शेख, तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, असलम खातिब, संतोष मडगावकर, राज पेडणेकर, समीर भट, संदीप सावंत, विजय कदम आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page