ग्रामस्थांचे आमदार दीपक केसरकर यांना निवेदन
सावंतवाडी ता.०९ : कलंबिस्त गावात मोबाईल रेंज व्यवस्थित नसल्याने विविध प्रकारचे ऑनलाईन कामकाज करणे, विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे, पालक व प्रशासकीय कर्मचारी यांना अडचणीचे ठरत आहे. यासाठी कलंबिस्त ग्रामस्थांनी गावात बीएसएनएल टॉवर मंजूर व्हावा, यासाठी आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आमदार केसरकर यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या मार्च महिन्यात प्रस्तावित टॉवर कलंबिस्त गावात उभारण्याची सूचना केली.
तत्पूर्वी गावातील मोबाईल रेंजची समस्या लक्षात घेऊन तात्पुरती गैरसोय टाळण्यासाठी लगतच्या शिरशिंगे, आंबोली गावातील टॉवरची कार्यक्षमता वाढविण्याची सूचनाही केली. यावेळी संजीव पालकर, बाळकृष्ण सावंत, रवीकमल सावंत, सुहासिनी पवार, विश्वनाथ बिडये, सचिन कदम, बाबुराव तावडे, संतोष सावंत, सुशांत पवार, समीर राजगे, विनिता कविटकर, शोभा कविटकर, अभिजीत जाधव, किशोर वालावलकर, धनराज सजगुरे, प्रभाकर घोगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
