सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जि. प. 6 मधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ….

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले वाटप

सावंतवाडी ता.०२-:* येथील कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय क्र. ६ या आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेतील मुलांना माजी नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनिषा राणे, उपाध्यक्षा प्राप्ती राणे, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सायली लांबर, सहाय्यक शिक्षिका गीता सुतार, श्रीमती सांगेलकर, सौ. कोचरेकर, बालवाडी शिक्षिका गावडे बाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे शिक्षक तसेच पालकवर्गातून कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page