शरद पवारांच्या विचारांचा झेंडा सावंतवाडी नगर परिषदेवर फडकेल

राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक शेखर माने यांचा विश्वास

सावंतवाडी ता.०२-: पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडी शहरात लढेल राष्ट्रवादीचा झेंडा नगरषरिदेवर फडकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा परिक्षक शेखर माने यांनी येथील आयोजित आढावा बैठकित व्यक्त केला. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरषरिदेत पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत निवडणूकांत स्वबळाची तयारी पक्ष करत असून महाविकास आघाडीबाबत पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो स्वीकारला जाईल अस मत देखील श्री माने यांनी व्यक्त केले.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी त्यांच शहरात स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरषरिद निवडणूकीबाबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा करत आढावा घेतला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, सांगलीचे नगरसेवक प्रदीप कांबळे, भास्कर विभूते, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page