सावंतवाडी : मळेवाड जकात नाका येथील श्री गणेश मंदिरात शुक्रवार, ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
सकाळी विधीवत पूजा, अभिषेक, महाआरती, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर फुगडी, भजन व सायंकाळी ७ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा ‘मयुरेश्वर गणपती’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कोरोनाविषयी नियमांचे पालन करून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
