ई श्रम कार्ड नोंदणी व वाटप आणि आधारकार्ड अपडेट शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील प्रभाग ७ च्या नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांच्या आडवण येथील निवास स्थानी आयोजित केलेल्या ई श्रम कार्ड नोंदणी व वाटप तसेच आधार कार्ड अपडेट या दोन्ही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून शहरातील बहुसंख्य नागरिकांनी ई श्रम कार्ड नोंदणी केली.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका पूजा करलकर यांच्यासह विठू वराड़कर, सौ. दिशा पाटकर, सौ. विशाखा पाटकर, अक्षय जुवेकर, महेश मांजरेकर (रेवतळे), रविकिरण आपटे आदी उपस्थित होते. या शिबिराचा मालवण शहरातील देऊळवाड़ा सातेरी मंदिर, आडवण, हिंदळेकरवाड़ा, लुडबेवाड़ा, कुंभारमाठ, भरड़, रेवतळे आणि मालवण बाजारपेठ येथील नागरिकांनी लाभ घेत ई श्रम कार्ड नोंदणी केली.

ई श्रमकार्ड व आधार अपडेट शिबिरासाठी सौ. स्वाती कुंभार, शीतल जाधव, रोहन सावंत, सिद्धेश फटकुरे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. नगरसेविका पूजा करलकर यांनी आतापर्यंत मोदी सरकारच्या उज्वला गॅसयोजना योजना, शेतकरी सन्मानयोजना, घरकुल योजना आदी विविध योजनांचा लाभ आपल्या प्रभागातील व इतर नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. या उपक्रमा बाबत नागरिकांनी नगरसेविका पूजा करलकर यांचे आभार मानले तसेच मोदी सरकारच्या नवनवीन योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहचविल्या बद्दल कौतुक केले.

You cannot copy content of this page