*💫मालवण दि.०४-:* आजच्या पिढीला सावित्रीबाई फुलेंच्या समग्र इतिहासाची फारशी माहिती नाही.सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागामुळे आज प्रत्येक महिला शिक्षण घेत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावित्रीबाई फुलेंनी समग्र माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी येथे बोलताना केले. बॅ. नाथ पै सेवांगण व साने गुरुजी वाचन मंदिर यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे सावित्री उत्सवानिमित्त शालेय गटातील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी देवदत्त परुळकेर हे बोलत होते. याप्रसंगी सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर , संग्राम कासले, शिवराज सावंत, मेघना जोशी , सुरेश ठाकुर, अरविंद परुळेकर, शैलेश खांडाळेकर, रुजारिओ पिंटो , शैलजा पाटील , शुभांगी सुकी , किशोर शिरोडकर आदी उपस्थित होते . अॅड . परुळकेर म्हणाले , सावित्रीबाई फुले म्हटल्या की आपल्याला त्यांच्याविषयी ठराविक गोष्टीच माहीत असतात. परंतु पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरलेली असतानाही सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा करण्याचे व्रत सोडले नाही. प्लेगच्या साथीमध्येचे सावित्रीबाई फुलेंचे निधन झाले. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचे कार्य आपल्याला विसरता येणार नाही. यावेळी संग्राम कासले,सुरेश ठाकुर, दीपक भोगटे यांनी मनोगते व्यक्त केली. स्पर्धेचा निकाल: सेवांगणच्यावतीने ‘मला भेटलेली सावित्रीची लेक’ या विषयावर आठवी ते दहावी या इयत्तेसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . प्रथम दिक्षा रामचंद्र हडकर , द्वितीय गायत्री संतोष गावकर , तृतीय मानसी नीलेश करलकर यांनी क्रमांक प्राप्त केले. विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . शिवराज सावंत , मेघना ‘ जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋतुजा केळकर , मनोज गिरकर , संजय रोगे , निरंजन अवसरे , आदिती कुडाळकर, सोनली कांबळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी तर आभार लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मानले.
सावित्रीबाई फुले यांचा त्याग जाणून घेण्यासाठी त्यांचे समग्र साहित्य जाणून घेणे आवश्यक – अँड. देवदत्त परुळेकर
