*हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनचा हलगर्जीपणा वाहनचालकांच्या जीवावर
*💫कणकवली दि.०४-:* हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनचा हलगर्जीपणा वाहनचालकांच्या जीवावर उठत असून कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवरील बॅरीकेट्स चालत्या दुचाकीवर पडून दुचाकीस्वार जखमी झाला आहे. नंदू सावंत आपल्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकल घेऊन पटवर्धन चौकातून जानवली च्या दिशेने जात होते. हायवे उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून शहरातील सर्व्हिस रोडलगत हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन ने बॅरिकेट्स लावले आहेत. हे बॅरिकेट्स आतल्या बाजूने एकमेकांना तारेने जोडलेले असतात. यातीलच एक बॅरिकेट्स मोटरसायकलने जाणाऱ्या नंदू सावंत यांच्या अंगावर पडला. या अपघातात सावंत यांना किरकोळ दुखापत झाली असून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटरसायकलचेही किरकोळ नुकसान झाले आहे.
