*इन्सुली भाजप नेते सचिन पालव शिवसेनेत दाखल

इन्सुली ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार- रुपेश राऊळ*

*💫सावंतवाडी दि.०४-:* इन्सुली येथील भाजप नेते सचिन पालव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सारख्या पक्षाला शिवसेनेने दिलेला जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे इन्सुली मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सचिन पालव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बबन राणे, सचिन‌ पालव, सखाराम पालव, संजय गावकर, सेजल गावकर, भिमसेन परब आदीसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page