कणकवलीत येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे माघी गणेश जयंती

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली 29 जानेवारी (प्रतिनिधी)-कणकवलीतील सिद्धिविनायक मित्र मंडळा मार्फत प्रतिवर्षीप्रमाणे 4 फेब्रुवारी रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात समोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गणेश मूर्तीचे मिरवणुकीने आगमन. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा, सकाळी 8 वाजता सत्यनारायणाची महापूजा, 10 वाजता आरती व तीर्थ प्रसाद, दुपारी 3 वाजल्यापासून भजने, रात्री 8 वाजता महाआरती, 8.30 वाजल्यापासून भजने. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत नवस बोलणे, नवस फेडणे, 1 वाजता महाआरती, सायंकाळी 5 वाजता गणेश मूर्तीचे विसर्जन, असे कार्यक्रम होणार आहेत. कोविड मुळे शासनाचे नियम पाळून हे सर्व कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page