मालवण ता.२९-:* मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूलचय सहाय्यक शिक्षिका सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या (सेट) परीक्षेत, मराठी या विषयात यश मिळवले आहे. यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात त्यांना यश मिळाले होते. मराठी व इतिहास या दोन्ही विषयात यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती मध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
सदर परिक्षा ही युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी गोवा तसेच महाराष्ट्र मधून ७९७७५ बसले होते. त्यापैकी ५२९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ६.६४% एवढा लागला आहे. सदर परीक्षेत मराठी पाठोपाठ इतिहास या विषयात सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी यश मिळविले असून आपल्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवाचा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे सौ. तोरसकर यांनी सांगितले. सौ. तोरसकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
