कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सर्व्हिस रोड संदर्भात पक्ष बाजूला ठेवून जन आंदोलन उभारण्याचा निर्णय नांदगाव येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.
नांदगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच आफ्रोजा नावलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच निरज मोरये, पंचायत समिती सदस्या सौ. हर्षदा वाळके, ग्रामविकास अधिकारी हरमळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच शशिकांत शेटये ,संजय पाटील आदी ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.
संबंधित सर्व्हिस रोड संदर्भात कित्येक वेळा आंदोलन झाले आहे.मात्र यांचा अद्याप निवाडा झालेला नाही.जादा जागा संपादित करण्यासाठी मोजणी करून निस पुरण्या पलीकडे काही झाले असल्याचे निष्पन्न होत नाही.याला आता जवळपास दोन वर्षे लोटली आहेत . यामुळे सर्व्हिस रोड होणार तरी आहेत का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
