मुख्यमंत्री हे सतीश सावंत यांना साजेशी नवीन जबाबदारी देतील

पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा;जि.प.त महाविकास आघाडीची सत्ता आणूया

*⚡कणकवली ता.२७-:* सतीश सावंत यांनी सहकारात चांगले काम करत जिल्हा बँक एका उंचीवर नेऊन ठेवली याची दखल शिवसेना पक्ष निश्चितपणे घेईल आणि त्याच उंचीएवढी नवीन जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतीश सावंत यांना देतील.सतीश सावंत यांनी मांडलेली विकासाची कामे, शेतकऱ्यांचे प्रश्न असो कि जलसिंचनाची कामे असोत ती नक्कीच पूर्ण केली जातील.येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आणून सतीश सावंत यांचा पुढचा वाढदिवस जि. प. अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य यांच्या समवेत साजरा करूया हाच वाढदिवसाचा संकल्प असेल असे प्रतिपादन पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केले. शिवसेना नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा वाढदिवस भिरवंडे येथे साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ना.उदय सामंत,माजी खास. ब्रि. सुधीर सावंत, आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, गौरीशंकर खोत, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, दिगंबर पाटील, व्हिक्टर डॉनटस, डॉ. प्रसाद देवधर, अमरसेन सावंत, एम.के. गावडे, शैलेश भोगले, नंदू शिंदे, कन्हेया पारकर, नीलम पालव, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत ,गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत जिल्हाभरातील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना आम.दीपक केसरकर म्हणाले,सतीश सावंत यांनी जिल्ह्यात जे नेतृत्व केले आहे ते मग सहकारात असो कि जि. प. मध्ये असो कि संघटनेत असो, त्याच उंचीवर त्यांना ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पक्ष नेतृत्वानेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आता एका विशिष्ट मर्यादेत न राहता त्यांनी पुढे जाऊन काम करावे. आपल्याला शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश आणण्याची ताकद देवो. यावेळी बोलताना माजी खास.सुधीर सावंत म्हणाले, आमचा दोघांचाही गाव एकचअसला तरी दोघांमध्ये प्रेमाचा आणि वादाचा संबंध ही आला परंतु जिल्हा बँकेत त्यांनी चांगले काम केले शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. आम्हाला बँकेच्या माध्यमातून चांगले सहकार्य केले. शेतकऱ्याचा मुलगा शोभेल असच काम केले आहे. आपल्या गावात असेच लोक निर्माण व्हावेत .समाजात आदर्श निर्माण करणारे असून त्यांच्या हातून समृद्ध व आनंदी गाव निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना सतीश सावंत म्हणाले,गावातील ग्रामस्थांनी दिलेले आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहिलेत म्हणूनच मी पंचवीस वर्ष विविध क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो .

या वाढदिवसाने मला प्रेरणा व उत्साह मिळाला आहे. बँकेच्या निवडणुकीत अपयशने खचून न जाता शिवसैनिकांनी जी साथ दिली त्यामुळे शेतकऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भिरवंडे व गांधीनगर येथील जलसिंचनाचे प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे .त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित बँक संचालक उपस्थित होते. सुधीर सावंत यांनी शिवसेना नेते बनावे माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी चांगले काम व संस्था उभारत आहेत मंत्रालयात विविध कामे घेऊन येत असतात त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे त्यासाठी सुधीर सावंत यांनी शिवसेना नेते बनावे अशी खुली ऑफर पालकमंती उदय सामंत यांनी दिली व त्यांना तयार करण्याची जबाबदारी सतीश सावंत यांच्याकडे दिली. त्याला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली सूत्र संचालन निलेश पवार यांनी तर प्रास्ताविक नितीन सावंत यांनी केले

You cannot copy content of this page