प्रजासत्ताकदिनानिमित्त नगरपालिकेचे आयोजन;नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी : प्रजासत्ताकदिनानिमित्त नगरपालिकेच्यावतीने शहरवासियांसाठी येथील मोती तलावात आयोजित केलेल्या ‘जलतरण सफर’ उपक्रमाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. शहरातील शेकडो नागरिकांनी जलतरण सफरीचा आनंद लुटला.
नगरपरिषदेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ (Reduce Reuse Recycle), माझी वसुंधरा-२ अंतर्गत – पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात जनजागृती करण्यासाठी २६ जानेवारी २०२२ रोजी ‘प्रजासत्ताक दिनी’ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत नगरपरिषदेच्या मोतीतलावातील ‘जलक्रिडा केंद्र’ येथे शहरातील नागरिकांसाठी ‘जलतरण सफर’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
कोविड-१९चे दोन डोस घेतलेल्या शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग देण्यात आला.कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणण्यास मनाई होती. दरम्यान, नगरपरिषदेच्या कारिवडे येथील घनकचरा प्रकल्प केंद्रास भेट देऊन घनकचरा प्रक्रियेबाबत माहिती दिली. नागरिकांसाठी हे प्रकल्प केंद्र खुले ठेवण्यात आले होते. या ‘जलक्रिडा सफर’ मध्ये शहरातील बहुसंख्य नागरिक कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन सहभागी झाले.
हा उपक्रम नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्यअधिकारी जयंत जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सर्वत्र याच कौतुक केले गेल. कोविड-१९चे दोन डोस घेतलेल्या शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग देण्यात आला.कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणण्यास मनाई होती. दरम्यान, नगरपरिषदेच्या कारिवडे येथील घनकचरा प्रकल्प केंद्रास भेट देऊन घनकचरा प्रक्रियेबाबत माहिती दिली. नागरिकांसाठी हे प्रकल्प केंद्र खुले ठेवण्यात आले होते. या ‘जलक्रिडा सफर’ मध्ये शहरातील बहुसंख्य नागरिक कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन सहभागी झाले. हा उपक्रम नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्यअधिकारी जयंत जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
