साक्षी वंजारी यांचे पालकमंत्र्यांना प्रत्युत्तर
सावंतवाडी : काँग्रेस जिल्हाध्यक्षांना कोणताही गैरसमज नसून महाविकास आघाडीबद्दल त्यांना चांगली समज आहे. त्यामुळे आमच्या ज़िल्हाध्यक्षाबाबत पालकमंत्र्यांनी कोणतेही बेजबाबदार विधान करू नये, असा विनंतीवजा इशारा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिला आहे.
‘काँग्रेसचे ज़िल्हाध्यक्ष काय म्हणतात त्यापेक्षा संपर्कमंत्री काय म्हणतात हे महत्वाचे,’ या पालकमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यावर वळंजू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री उदय सामंत यांना काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे कदाचित माहिती नसावीत. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ‘वरून’ दिलेल्या हुकुमावर चालत नाही. पक्षाचे निश्चित ध्येयधोरण असून विचारविनिमय आणि मार्गदर्शनावर निर्णय घेतले जातात.
जिल्हाध्यक्ष हे जिल्ह्यातील प्रमुखपद आहे. जिल्हाध्यक्षाचे मत विचारात घेतल्याशिवाय जिल्ह्यातील कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. जिल्हाध्यक्ष हा नेहमी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आपले मत संपर्कमंत्री, प्रभारी प्रदेशाध्यक्षांना कळवत असतात. त्यानंतर संपर्कमंत्री, प्रभारी व प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानेच आपला निर्णय देत असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आमच्या जिल्हाध्यक्षाबदल असे विधान पुन्हा चुकूनही करू नये, असा इशारा वंजारी यांनी दिला आहे. .
