सुरेश भोगटे यांच्या तक्रारीची दखल : डाकघर अधीक्षकांची पोस्ट कार्यालयाला भेट; तूर्तास आंदोलन स्थगित
*⚡सावंतवाडी ता.२३-: येथील पोस्ट कार्यालयात ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आवाज उठवताच याची दाखल सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता तसेच ए एस पी पोस्ट उपअधीक्षक सावंतवाडी पोस्ट कार्यलयाला भेट देत त्या प्रकाराबाबत अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यामुळे 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की 15 जानेवारी रोजी माजी नगरसेवक सुरेश भोगटे हे कुरियर करण्यासाठी पोस्ट मध्ये गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून उर्मट तसेच असभ्य वागणूक देण्यात आली होती या प्रकारानंतर श्री भोगटे यांनी पोस्टमास्टर एस पी कंसपले यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले व त्यांच्यासमोर पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीची लक्तरे उघडी केली यानंतर संबंधित चुकीची वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्याने भोगटे यांची माफीही मागितली होती यानंतर या प्रकाराची दाखल अधीक्षक अभियंता ओरोस यांनी घेत येथील पोस्ट कार्यालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली तसेच त्यानंतर ग्राहकांना चांगली सेवा देण्याबाबत सूचना केल्या
