पाच वर्षांच्या मुलासह वडील, एक महिला किरकोळ जखमी
सावंतवाडी ता.२१-:गोव्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या ईनोव्हा कारचा माजगाव तांबळगोटन येथे झाडाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला असून, पाच वर्षाच्या मुलासह, वडील, एक महिला किरकोळ जख्मी झाली आहेत. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
चालकाला झोप आल्याने गाडी झाडाला धडकून हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यावर मोठा आवाज झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत जखमींना गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
