नील बांदेकरचे दुहेरी यश…

दोन वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेत पटकावला द्वितीय नंबर

*⚡सावंतवाडी ता.२१-:* D.D.C लर्निंग चैनल आयोजित कथाकथन स्पर्धेत केंद्र शाळा नंबर 1 मधील, इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी कुमार नील नितीन बांदेकर याने संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून, संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘संविधान आणि मी’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेतही कु. नील बांदेकर याने पहिली ते आठवी या गटात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे.

नीलने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन, विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका सरोज नाईक मॅडम, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर आणि आई- वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. या दुहेरी यशामुळे त्याच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page