गोठण ते चराठा आणि भोसले नॉलेजसिटी ते कारिवडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा…

मंगेश तळवणेकर यांची बांधकाम विभागाकडे मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी गोठण ते चराठा वझरवाडी आणि भोसले नॉलेज सिटी ते कारीवडे रस्ता संपूर्ण खराब झाला असून, रस्त्यावर खड्डे पडले असल्याने विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित रस्त्याची तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल रखुमाई संस्थेचे अध्यक्ष मंगेश तळवणेवकर यांनी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाकडे केली आहे.

याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील त्यानी यावेळी दिला आहे. यावेळी शैलेश सगम, दत्तप्रसाद कळंगुटकर, सहदेव राऊळ, संजय मेस्त्री उपस्थित होते.

You cannot copy content of this page